महेश गायकवाड यांच्यासह तब्बल 70 जणांविरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण?
शिवसेना कल्याण शहर अध्यक्ष माजी नगरसेवक महेश गायकवाड त्याचा साथीदार राहुल पाटीलसह तब्बल 70 जणांच्या विरोधात जमीन बळकवण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मात्र या गुन्ह्यात अजूनही महेश गायकवाड राहुल पाटीलसह 66 जण फरार असून यात महेश गायकवाड व राहुल पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे.
ठाणे, ९ फेब्रुवारी, २०२४ : शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाल्या होत्या. यानंतर राजकीय वर्तुळात आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण आणि जमीन वाद प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. दरम्यान, महेश गायकवाड त्याचा साथीदार राहुल पाटीलसह तब्बल 70 जणांच्या विरोधात जमीन बळकवण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. दरम्यान, उल्हासनगर न्यायालयात चार जणांना जमीन मंजूर करण्यात आलाय तर आमदार गणपत गायकवाड यांच्या ठेकेदारांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. उल्हासनगर चोपडा कोर्टात यामधील चौघांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यांना जामीन मिळाल्या असल्याची माहिती संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या गुन्ह्यात अजूनही महेश गायकवाड राहुल पाटीलसह 66 जण फरार असून यात महेश गायकवाड व राहुल पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे.