प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Aug 27, 2022 | 3:25 PM

प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. आमदार प्रशांत बंब यांना अज्ञात महिलेनं फोनवरून शिवीगाळ केली होती. लासूर गावाच्या सरपंच मीना तांडेल यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न विचारल्याच्या कारणास्तव या महिलेकडून शिवीगाळ करण्यात आली. शिक्षकांनी मुख्यालयी रहावं, याविषयीचा प्रश्न बंब यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी आणि शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडं उचलून शासनाची फसवणूक करतात, असं ते म्हणाले होते.

Published on: Aug 27, 2022 03:25 PM
दापोलीतील साई रिसॅार्टबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होतेय- संदिप देशपांडे