प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV फुटेज आलं समोर

| Updated on: Dec 05, 2023 | 1:56 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना ३० ऑक्टोबर रोजी माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा समाजाच्या आंदोलकांनी दगडफेक करत त्यांचं घरंच पेटवल्याचे पाहायला मिळाले होते. याच संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Follow us on

बीड, ५ डिसेंबर २०२३ : मराठा आंदोलनाचा मुद्दा अद्याप राज्यात तापलेला दिसतोय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ हे दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसताय. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या राज्यातील चौथ्या टप्प्यातील सभांना सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना ३० ऑक्टोबर रोजी माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा समाजाच्या आंदोलकांनी दगडफेक करत त्यांचं घरंच पेटवल्याचे पाहायला मिळाले होते. इतकंच नाहीतर प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या आवारात उभी असलेली वाहनं देखील मराठा आंदोलकांनी पेटवली होती. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. याच संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.