Special Report | हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपीन रावत यांचं निधन-TV9

| Updated on: Dec 08, 2021 | 8:59 PM

माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीसह आणखी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीचा भडका उडाला. हेलिकॉप्टरमुळे काही झाडेही कापली गेली. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.

नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये आज लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीसह आणखी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीचा भडका उडाला. हेलिकॉप्टरमुळे काही झाडेही कापली गेली. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यावरून हा अपघात किती मोठा होता हे दिसून येते. हेलिकॉप्टर संपूर्णपणे जळून खाक झालेलं या फोटोत आणि व्हिडीओत दिसत आहे. तसेच आजूबाजूचे काही झाडंही जळून गेल्याचं दिसत आहे.

Published on: Dec 08, 2021 08:59 PM
Special Report | CDS जनरल बिपीन रावत …1958-2021-TV9
Special Report | संजय राऊतांच्या खुर्चीवरून राजकीय खेचाखेची