Mumbai च्या आरे कॉलनीत जागतिक आदिवासी दिन साजरा
जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोरेगावमधील आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यावर आज सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. येथील स्थानिक आदिवासी बांधवांनी पारंपारीक गौरीही नृत्य सादर केलं. स्वतः स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनीही या गौरी नृत्यावर ठेका धरला.
मुंबई : मुंबईच्या आरेत आज जल्लोषात आदीवासी दिन साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोरेगावमधील आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यावर आज सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. येथील स्थानिक आदिवासी बांधवांनी पारंपारीक गौरीही नृत्य सादर केलं. स्वतः स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनीही या गौरी नृत्यावर ठेका धरला. इथल्या फोर्स वनच्या जागेवर असलेले आदिवासींच्या झोपड्यांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे फोर्सला फायरिंगचा सराव करता येत नाही. याबाबत सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी केली.