उद्धव ठाकरेंना मोठा झटका, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितादरम्यान मतदान सुरु असताना संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितादरम्यान मतदान सुरु असताना संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. या दिवशी मुंबईतील सर्व सहा लोकसभा जागांसह राज्यातील एकूण 13 जागांवर मतदान पार पडलं होतं. उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितादरम्यान मतदान सुरु असताना पत्रकार परिषद घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे हे मतदान यादीतून वगळण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाकडून मुद्दाम ज्या ठिकाणी ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला जास्त मतदान होऊ शकतं तिथे मतदानासाठी मुद्दाम जास्त वेळ लावला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.