Shard Pawar PC | मराठा आरक्षणावर केंद्राने भूमिका घ्यावी : शरद पवार
पुणे : “मराठा आरक्षणाच्या खोलात गेलो नाही, राज्य सरकारची चर्चा सुरु आहे, त्यातून मार्ग निघावा, मात्र ही अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी, जी मागणी आहे सुप्रीम कोर्टाने हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे असं सांगितलं आहे, त्यामुळे केंद्राने भूमिका घ्यायला हवी,” असं मत व्यक्त करत शरद पवार यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणावर आपली स्पष्ट […]
पुणे : “मराठा आरक्षणाच्या खोलात गेलो नाही, राज्य सरकारची चर्चा सुरु आहे, त्यातून मार्ग निघावा, मात्र ही अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी, जी मागणी आहे सुप्रीम कोर्टाने हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे असं सांगितलं आहे, त्यामुळे केंद्राने भूमिका घ्यायला हवी,” असं मत व्यक्त करत शरद पवार यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणावर आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली.
शरद पवार यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरही भूमिका मांडली, ते म्हणाले, “ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टाने रद्द केला. अधिकार कायम राहावा ही राज्याची भूमिका, त्यातून लवकर काही बाहेर पडावं. हा प्रश्न मराठवाडा, प महाराष्ट्र आणि कोकणातला आहे. विदर्भातील तितका विषय नाही. पण उर्वरित भागाच्या ओबीसी घटकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हा राज्य सरकारच्या प्रयत्नाचा भाग आहे, त्याचा लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा आहे.”