शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर नाराज, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 28, 2024 | 1:18 PM

४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र फक्त ८ महिने २२ दिवसात शिवरायांचा हा भव्य पुतळा कोसळला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच संतापाची लाट उसळली आहे. अशातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

Follow us on

मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्य सरकारने मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं होतं, असं म्हणत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. तर मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती, असं मत भाजपच्या वरिष्ठांचं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधकांकडून राजकीय मुद्दा बनवला जात असेल तर राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा, असं मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.  मालवणमध्ये बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला आहे. त्यामुळे शिवप्रेमींसह विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.