WITT Global Summit : उद्धव ठाकरे यांचं एकच ध्येय…आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अमित शाह यांचा खोचक टोला

| Updated on: Feb 28, 2024 | 11:16 AM

टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांची विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांना राजकीय वर्तुळातील अनेक मुद्द्यांवर सवाल करण्यात आले. अमित शाह यांनी या मुलाखतीत बोलत असताना इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली | 28 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांची विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांना राजकीय वर्तुळातील अनेक मुद्द्यांवर सवाल करण्यात आले. या प्रश्नावर अमित शाह यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिलेत. अमित शाह यांनी या मुलाखतीत बोलत असताना इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘एखाद्या सिद्धांताच्या आधारेवर चालणारा पक्ष असेल तर आघाडी टिकते. ‘इंडिया’ आघाडी म्हणजे घराणेशाही पुढे नेणारी अघाडी आहे. मुलांना, स्वताला मुख्यमंत्री पंतप्रधान बनण्यासाठी सगळ निघालेत. त्यांना भारताचं काही पडलं नाही. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हेच सोनिया गांधींचं लक्ष आहे. २१ वेळा त्यांनी प्रयत्न केले. आताही त्यांचा तोच प्रयत्न आहे. तर उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय, स्टॅलिन यांनाही मुलगा मुख्यमंत्री व्हावा वाटतोय. ममता बॅनर्जी यांनाही भाचीला सत्तेत आणायचं आहे. लालूंनाही तेच करायचं आहे. यात आघाडी कुठे आहे. या लोकांना आपल्या कुटुंबाला सत्तेत आणायचं आहे’, असे म्हणत अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Feb 28, 2024 11:16 AM