Narayan Rane | महाविकास आघाडी सरकारने राज्याला 10 वर्षे मागे नेलं : नारायण राणे

Narayan Rane | महाविकास आघाडी सरकारने राज्याला 10 वर्षे मागे नेलं : नारायण राणे

| Updated on: Dec 12, 2021 | 5:07 PM

राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार. सरकार अस्तित्वात आहे का हाच मुळात प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्ष मागे गेलंय, असे वक्तव्य करीत म्हाडा पेपर फुटीवर केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

कोल्हापूर : म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा  आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. याबाबत भाजप नेते नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे. राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार. सरकार अस्तित्वात आहे का हाच मुळात प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्ष मागे गेलंय, असे वक्तव्य करीत म्हाडा पेपर फुटीवर केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

Jaipur | महागाईविरोधात कॉंग्रेसचा एल्गार, सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी
Jitendra Awhad | म्हाडाचा पेपर फुटला नाही, त्याआधीच कारवाई झाली : जितेंद्र आव्हाड