Special Report | पाडव्याला नारायण राणे V/s उद्धव ठाकरे
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर थेट हल्लाबोल केला. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही.
मुंबई: राज्यातील ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार का? या प्रश्नावर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर थेट हल्लाबोल केला. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावा राणेंनी केला.