Central Railway BIG Breaking : तुम्ही वेटिंग तिकीटावर प्रवास करताय? ही बातमी वाचाच.. रेल्वे प्रशासनाचं मोठं पाऊल

| Updated on: Jun 23, 2024 | 11:30 AM

मध्य रेल्वेकडून वेटिंग लिस्टवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबईहून अनेक टर्मिनसवरून अनेक लांब पल्यांच्या गाड्या सुटतात. या गाड्यांमध्ये विशेषतः मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणीसाठी धडक मोहिम सुरू आहे.

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता रेल्वेमध्ये वेटिंग लिस्टच्या तिकीटावर प्रवास करता येणार नाही. कारण रेल्वे प्रशासनाकडून तसा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून वेटिंग लिस्टवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबईहून अनेक टर्मिनसवरून अनेक लांब पल्यांच्या गाड्या सुटतात. या गाड्यांमध्ये विशेषतः मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणीसाठी धडक मोहिम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान, ज्यांचं तिकीट वेटिंगवर आहे, अशा प्रवाशांना थेट गाडीतून खाली उतरवलं जात आहे. तिकीट वेटिंगवर असलं तर अनेक प्रवासी आरक्षित डब्ब्यात बसून प्रवास करतात. आरक्षित डब्यातील गर्दी दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडू हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Published on: Jun 23, 2024 11:30 AM
यंदा अजित पवारांना कुणाचं आव्हान? बारामती लोकसभेतील 6 विधानसभांचं नेमकं गणित काय?
Saamana : कुंपनाने शेत गिळले… ‘सामना’तून केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल, काय केला आरोप?