Central Railway BIG News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी; CSMT, भायखळा येथील रेल्वे प्रवाशांचे हाल होणार, कारण…

| Updated on: Oct 03, 2024 | 12:14 PM

Central Railway Update : तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकानुसार नवीन लोकल धावतील अशी प्रवाशांना आशा होती. मात्र, नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात येत्या शनिवारपासून बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रात्रीच्या कसारा आणि कर्जत या लोकल ट्रेन लवकर सोडण्यात येणार आहे. तर शेवटच्या कसारा आणि कर्जतच्या लोकल ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे प्रवाशांना धावपळ करावी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या २२ लोकल ट्रेन आता दादर रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या २२ लोकल ट्रेन दादर रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणार असल्याने सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि भायखळा रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार लोकल ट्रेन सेवांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. दररोज रात्री १२.१४ वाजता सुटणारी सीएसएमटी-कसारा ट्रेन, दररोज रात्री १२.२४ वाजता सीएसएमटी-कर्जत सुटणारी लोकल ट्रेन आता ५ ऑक्टोबरपासून सीएसएमटी–कसारा लोकल रात्री १२.०८ वाजता, तर सीएसएमटी–कर्जत लोकल रात्री १२.१२ वाजता सोडण्यात येणार आहे.

Published on: Oct 03, 2024 12:14 PM
सरकार ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात पुन्हा अॅडवान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 100, 200 नाहीतर ‘इतके’ रूपये स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागणार