लोकलने प्रवास करताय? ‘मध्य रेल्वे’वर 3 दिवस विशेष ब्लॉक, बघा कोणत्या ट्रेन रद्द तर कुठे राहणार वाहतूक बंद?

| Updated on: May 31, 2024 | 11:29 AM

शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर १ आणि २ जून रोजी ३६ तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे

Follow us on

मुंबई लोकलने कुठे बाहेर जाण्याचं नियोजन असेल तर थोडं थांबा… कारण शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर १ आणि २ जून रोजी ३६ तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर याचवेळी ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ ची रुंदी वाढविण्याचं काम केले जाणार आहे. घेण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या मेगा ब्लॉकमध्ये ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर विशेष ब्लॉकसाठी CSMT ते भायखळापर्यंत ३६ तास वाहतूक बंद राहणार आहे. यासोबत हार्बर मार्गावरील CSMT ते वडाळ्यापर्यंत ३६ तासांसाठी वाहतूक बंद असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान, ६५ हून अधिक मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो काम नसल्यास घराबाहेर जाणं टाळा, असं आवाहनही मध्य रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.