मुंबईकरांनो आता बिनधास्त घराबाहेर पडा, कारण…,‘मध्य रेल्वे’च्या विशेष मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट

| Updated on: Jun 02, 2024 | 1:52 PM

शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेकडून घोषित करण्यात आला होता. तीन दिवसाच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते. मात्र त्याच मुंबईकरांसाठी मेगा ब्लॉक संदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Follow us on

मध्य रेल्वेने शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला होता. या मोठा तीन दिवसाच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते. मात्र त्याच मुंबईकरांसाठी मेगा ब्लॉक संदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात आलेला तीन दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक आज संपला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन लोकल सेवा सुरु झाली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन लोकल सेवा सुरु झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी तर ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ ची रुंदी वाढविण्याचं काम करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांना मोठा ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकदरम्यान, तब्बल ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचेही पाहायला मिळाले होते.