Breaking | मध्य रेल्वेवर आजपासून 36 तासांचा जम्बो ब्लॉक, ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम
ठाणे आणि दिवा (Thane to Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Block) घेण्यात आला आहे
ठाणे आणि दिवा (Thane to Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Block) घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान सुरु राहील. आज दुपारी दोन वाजल्यापासून ब्लॉक सुरु होईल. तो ब्लॉक सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहेत.