Central Railway Update : सायन-माटुंगा दरम्यान नेमकं काय झालेलं? ज्यामुळं ‘मरे’ची वाहतूक होती विस्कळीत? प्रवाशी संतप्त

| Updated on: Jul 24, 2024 | 10:53 AM

आज बुधवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. भर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने सकाळी ऑफिसच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांनी लेक मार्क लागण्याच्या चिंतेने मध्य रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक ही १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज बुधवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. भर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने सकाळी ऑफिसच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांनी लेक मार्क लागण्याच्या चिंतेने मध्य रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. मात्र सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान एक नवं बांधकाम सुरू होतं. त्याचे बांबू सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरची रेल्वे वाहतूक खोळंबल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल्स एकाच जागी थांबून होत्या. मात्र रेल्वे प्रशानसनाकडून याची दखल घेत माटुंगा सायनमध्ये विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जलद मार्गावरील ओवरहेड वायरवर जे इमारतीच्या कन्स्ट्रक्शन साईटचे बांबू पडले होते ते सगळे बाजूला करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झाली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Published on: Jul 24, 2024 10:53 AM
Ladki Bahin Yojana : अजित दादांनी योजनेचं नावचं बदललं, आता लाडकी… शरद पवार गटातील नेत्याचा आरोप
भाजपचे ‘हे’ 4 मंत्री बिनकामाचे, दादांच्या आमदारानं सरकारला दिला घरचा आहेर; म्हणाले, गेल्या 6 महिन्यांपासून….