OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्याविरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्याविरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी कोर्टाची लढाई एका बाजूला सुरु असून सरकार सर्व सहकार्य करत आहे. मात्र ओबीसी समाजातील नागरिकांना नेमकं आरक्षणांच गणित कळालेलं नाही. ते आधी समजून घेणं महत्वाचं असून आम्ही लवकरच यावर योग्य पावलं उचलणार आहोत. सरकार प्रयत्नशील आहे.
Published on: Jun 26, 2021 12:24 PM