‘…हे लिखित स्वरूपात द्या’, कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचं उद्यापासून साखळी उपोषण
VIDEO | मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही... यावर चर्चा सुरू असताना आता मराठा समाजातून ओबीसींना आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी उद्या तिसऱ्या दिवसापासून ओबीसी नेते साखळी उपोषण सुरु करणार
नागपूर, ११ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणावर तोडगा कधी निघणार याकडे साऱ्याचे लक्ष लागलेले असताना आता कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचं उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा समाजातून ओबीसींना आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी उद्या तिसऱ्या दिवसापासून ओबीसी नेते साखळी उपोषण सुरु करणार आहे, तरीही मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने लेखी आश्वासन देईपर्यंत, आंदोलन सुरु राहील, उद्यापासून आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीकडून सांगण्यात आले असून उद्यापासून नागपूरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यात उद्या आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील राज्य सरकारला देण्यात आला आहे.