Nagpur Rain Update | विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी
विदर्भात मुसळाधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. IMD कडून विदर्भात दोन दिवस ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
विदर्भात मुसळाधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. IMD कडून विदर्भात दोन दिवस ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ‘चंद्रपूर, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर, नागपरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागाचे संचालक मोहनलाल शाह यांनी ही माहिती दिलीय.
एकीकडे मुंबई आणि कोकणात मुसळाधार पाऊस पडतोय, तर दुसरीकडे विदर्भातंही मुसळाधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात ॲारेंज अलर्ट जारी केलाय. विदर्भातील गडचीरोली आणि चंद्रपुर या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाची शक्यता आहे, असं याबाबत नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.