शीतल म्हात्रे अगाऊ, तिनेच…, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावरून ठाकरे गटाचा आरोप

| Updated on: Nov 17, 2023 | 4:45 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतीस्थळावर जोरदार राडा झाला. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटातील महिला नेत्यावरच आरोप केलाय

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतीस्थळावर जोरदार राडा झाला. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावरून खैरे यांनी शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. खैरे म्हणाले, ती शीतल म्हात्रे अगाऊ आहे. तिने काल बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अगाऊपणा केला. अजून कोण तो नरेश आहे. तिने हटकून उचकवलं आणि कालचा राडा केला असल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला. तर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ हे आपलं श्रद्धा स्थान आहे. संयम बाळगा त्या ठिकाणी काही करू नका, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले. तर शीतल म्हात्रे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाकडून महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप केला. यावरही चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘यांचेच लोकं त्यांना धक्काबुक्की करत होते.’

Published on: Nov 17, 2023 04:45 PM