‘तो’ दिव्यांग नाही तर आत्मनिर्भर, बघा त्याची जिद्द अन् प्रेरणादायी कहाणी
VIDEO | नांदेडमधल्या दिव्यांग युवकाची जिद्द अन् शेती फुलवून कमावले लाखोंचे उत्पन्न, बघा प्रेरणादायी जिद्दीची कहाणी
नांदेड : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चोरंबा इथल्या दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या चंद्रकांत नरोटे या युवकाच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होताना दिसतं. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या या युवकाने कोणतीही हार न मानता जिद्द कायम ठेवली आणि त्याच जिद्दीने शेती फुलवल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत नरोटे हा युवक शेतीतील सगळी कामे स्वतः करतात. अवघ्या तीन एकर क्षेत्रात हा युवक लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर या दिव्यांग युवकाने दोन बहिणीचे विवाह लावून दिले आहेत. आता घरची जबाबदारी सांभाळत हा युवक आता तिसऱ्या बहिणीच्या लग्नाची जोरदार तयारी करतोय. सरकारकडून मिळालेल्या तीनचाकी वाहनांचा वापर करत सकाळच्या सत्रात तो दूध विक्रीचा देखील व्यवसाय करतो. धडधाकट असलेल्या तरुणाने आदर्श घ्यावा अशी या दिव्यांग युवकाची प्रेरणादायी कहाणी आहे. बघा या युवकाची जिद्द आणि त्यांच्या जिद्दीची कहाणी…