Special Report | चंद्रकांत पाटील वाद का निर्माण करतायत ?

Special Report | चंद्रकांत पाटील वाद का निर्माण करतायत ?

| Updated on: Dec 17, 2021 | 8:56 PM

शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक (Hindu Vote Bank) तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याबाबत आज स्पष्टीकरण देतानाही पाटील यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे.

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची बेधडक वक्तव्य आणि वादाची मालिका सुरुच आहे. चंद्रकांत पाटील यांनी राजकीय भाष्य करताना व्होट बँकेच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) आणलं. शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक (Hindu Vote Bank) तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याबाबत आज स्पष्टीकरण देतानाही पाटील यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे. पाटील म्हणाले की, मी म्हणालो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय? याच वक्तव्याला घेऊन कुणीतरी निदर्शनं करणार होतं. मला धमकी आली, मात्र, हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही, असा इशाराही पाटील यांनी दिलाय.

OBC : ‘आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल’
MPSC Exam | MPSCच्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय, प्रशासन विभागाकडून जीआर जारी