एकनाथ शिंदेचं बंडात भाजपची कोणतीही पूर्वयोजना नाही- चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 21, 2022 | 4:02 PM

"अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाली, तेव्हापासून अनेक आमदारांमध्ये खदखद होती. आता एकनाथ शिंदेंनी जे बंड पुकारलंय, त्यामागे भाजपची कोणतीही पूर्वयोजना नाही," अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“यात एवढंच मी म्हणेन की समझनेवाले को इशारा काफी है. आता कुठलंही मत व्यक्त करणं हे टू अर्ली (too early) होईल. आता वेट अँड वॉच अशी स्थिती भाजपची आहे. अचानकच काल संध्याकाळी हा मेसेज आला की काही जण नॉटरिचेबल आहेत. त्यातून हळूहळू पुढे विषय चालला आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाली, तेव्हापासून अनेक आमदारांमध्ये खदखद होती. आता एकनाथ शिंदेंनी जे बंड पुकारलंय, त्यामागे भाजपची कोणतीही पूर्वयोजना नाही,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाविरोधात बंड पुकारलंय, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.  सकाळपासून एकनाथ शिंद यांच्या बंडामुळे राजकारण ढवळून निघालं आहे.

Published on: Jun 21, 2022 04:02 PM
ऑपरेशन कमळ: एकनाथ शिंदे यांचं बंड कसं झालं?
राष्ट्रवादीचे सगळे आमदार संपर्कात- जयंत पाटील