BJP MNS Yuti | कृष्णकुंजवर मन की बात, चंद्रकांत पाटील राज ठाकरेंची बैठक सुरु

| Updated on: Aug 06, 2021 | 1:13 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज साहेब ठाकरे यांची माझी नाशिकला अचानक भेट झाली. तेही प्रवासात होते, मीही प्रवासात होतो. त्यावेळी आमचं बोलणं झालं, मुंबईत केव्हातरी घरी भेटूया. कुठल्याही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, घरी बोलावणं.. पहिला प्रश्न आहे भाजप महाराष्ट्र अध्यक्ष राजसाहेबांच्या घरी का गेले, भाजप प्रदेश कार्यालयात का गेले नाहीत, मुळात मी असा अहंकार बाळगणारा नाही. भाजपचीच नाही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, कोणी घरी बोलावलं तर येतो म्हणणं. त्यांच्या निमंत्रणाचं स्वीकार करुन मी घरी आलो.. दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच, ती झाली. परंतु भाजप-मनसे युतीचा प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, हा विषय होता. मनसे आणि राज ठाकरेंनी परप्रांतीयांची भूमिका बदलल्याशिवाय आम्ही चर्चाही करु शकत नाही. त्यांनी एक क्लिप मला भाषणाची दिली होती. यूपीमध्ये भाषण व्हायरल झालं होतं. ते मी ऐकलं. त्यावर चर्चा झाली. सदिच्छा भेट झाली, राजकीय चर्चा असेल तर ती युतीची नाही, एकमेकांच्या भूमिकांची झाली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Aaditya Thackeray | रेल्वे प्रवासाबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय – मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती
BJP-MNS Yuti | राज ठाकरेंसोबत नेमकी काय चर्चा झाली? चंद्रकांत पाटील म्हणाले…