VIDEO : Pune BJP Protest | मंदिरांबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा… चंद्रकांत पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम

| Updated on: Aug 30, 2021 | 1:40 PM

भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंखनाद आंदोलनात भाग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जर सरकार मंदिरं सुरू करणार नसतील तर आम्हालाच मंदिरे सुरू करावी लागतील.

भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंखनाद आंदोलनात भाग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जर सरकार मंदिरं सुरू करणार नसतील तर आम्हालाच मंदिरे सुरू करावी लागतील. आजपासून लोक भावना दाबून ठेवणार नाहीत. कुलूप तोडून लोक मंदिरं खुली करतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आधी आंदोलकांना संबोधित केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरं उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 30 August 2021
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 August 2021