आता बोंबला..हे काय घडलं! गाडी उभी दारातच तरी FASTag मधून गेले पैसे
गाडी दारातच उभी आणि फास्ट टॅग मधून पैसे कापल्या गेल्याचा प्रकार समोर आलाय. डोकं चक्करमध्ये टाकणाऱ्या या प्रकाराची पंचक्रोशित चर्चा होतेय. चंद्रपूर शहरातील व्यवसायी आणि पत्रकार जितेंद्र चोरडिया यांच्या सोबत हा प्रकार घडलाय.
चंद्रपूर, २१ डिसेंबर २०२३ : गाडी दारातच उभी आणि फास्ट टॅग मधून पैसे कापल्या गेल्याचा प्रकार समोर आलाय. डोकं चक्करमध्ये टाकणाऱ्या या प्रकाराची पंचक्रोशित चर्चा होतेय. चंद्रपूर शहरातील व्यवसायी आणि पत्रकार जितेंद्र चोरडिया यांच्या सोबत हा प्रकार घडलाय. चोरडिया हे चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरात राहतात. काल रात्री मालेगाव टोल नाक्यावरून ते चंद्रपूर येथे आलेत. चोरडिया यांच्याकडे इनोव्हा ही गाडी असून त्याचा नंबर MH 34 AM 4410 असा आहे. काल त्यांच्या फास्टटॅगमधून ६२५ रुपये कापण्यात आले. मोबाईलवर हा मॅसेज पाहताच आधी त्यांना गाडी चोरीला गेल्याची शंका आली. विशेष म्हणजे गाडी दारासमोरच उभी होती आणि फास्टटॅगचं स्टीकर देखील गाडीतच होतं. तरी हा गोंधळात टाकणारा प्रकार घडला. ते याआधी कधी मालेगावला देखील गेलेले नाहीत, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे नेमकं हे झालं कसं असा प्रश्न आता त्यांना पडलाय.