Chandrapur Tadoba Jungle | वाघीण आणि अस्वलाच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद
ताडोबाच्या जंगलात वाघीण आणि नर अस्वल एकमेकांना थेट भिडले. समोरासमोर आल्यानंतर या दोन्ही वन्यजिवांनी लढाईचा पवित्रा घेतला होता.
जंगली प्राण्यांची लढाई त्यांच्यातील युद्ध नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ तर आवाडीने पाहिले जातात. सध्या अशीच एक वाघीण आणि नर अस्वलाची लढाई चर्चेचा विषय ठरली आहे. दोघांमधील युद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ताडोबा जंगलातील आहे. ताडोबा जंगलात दोन वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये झुंज लागल्याचे पाहायला मिळाले. जंगलात वाघीण आणि नर अस्वल एकमेकांना थेट भिडले. समोरासमोर आल्यानंतर या दोन्ही वन्यजिवांनी लढाईचा पवित्रा घेतला होता. हा सर्व प्रकार पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. नर अस्वल आणि वाघीण एकमेकांसमोर आल्यामुळे पर्यटकदेखील काही काळासाठी थबकले होते.