Chandrapur Tigress Death | चंद्रपुरातील भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृत्यू
जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृत्यू झालाय. चंदनखेडा-वायगाव रोडवरील रणदिवे नामक शेतकऱ्याच्या शेतात हा मृतदेह आढळला. मयत वाघीण अंदाजे 3 वर्षांची असण्याची शक्यता आहे. हा मृत्यू शेतातील कुंपणात लावलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृत्यू झालाय. चंदनखेडा-वायगाव रोडवरील रणदिवे नामक शेतकऱ्याच्या शेतात हा मृतदेह आढळला. मयत वाघीण अंदाजे 3 वर्षांची असण्याची शक्यता आहे. हा मृत्यू शेतातील कुंपणात लावलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.