चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू
दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बावनकुळे यांनी ट्वीट करुन त्याबाबत माहिती दिलीय. सौम्य लक्षणं असून घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
राज्यात विविध राजकीय पक्षाचे नेते पुन्हा एकदा कोरोनाच्या कचाट्यात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बावनकुळे यांनी ट्वीट करुन त्याबाबत माहिती दिलीय. सौम्य लक्षणं असून घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती’, असं ट्वीट करत बावनकुळे यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती देत संपर्कातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.