भाजपकडून इनकमिंगचं निमंत्रण? ‘या’ तिघांना ऑफर, पण बावनकुळेंनी स्पष्ट म्हटलं, आम्ही कुणालाही…

| Updated on: Jan 19, 2024 | 12:45 PM

फक्त सुशीलकुमार शिंदे यांनीच आपल्याला भाजपची ऑफर आहे असं सांगितलं नाही तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह राजू शेट्टी यांनी देखील म्हटले आहे. थोडक्यात काय तर भाजपकडून ऑफर आल्याचा दावा तीन नेत्यांनी केलाय. यावर काय म्हणाले बावनकुळे?

मुंबई, १९ जानेवारी २०२४ : आपल्याला भाजपची ऑफर आहे असं फक्त सुशीलकुमार शिंदे यांनीच सांगितलं नाही तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह राजू शेट्टी यांनी देखील म्हटले आहे. थोडक्यात काय तर भाजपकडून ऑफर आल्याचा दावा तीन नेत्यांनी केलाय. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी या भाजपच्या ऑफरवर बोलताना त्यांनी स्पष्टच म्हटलं की काँग्रेस सोडणार नाही, राजू शेट्टी यांनी म्हटलंय आडमार्गांनं किंवा मध्यस्थांच्या मार्फत केंद्रीय मंत्र्यांना भेटा असे निरोप येताय तर अंबादास दानवे म्हणाले, ऑफर येतच असतात पण गद्दारी करणार नाही, असं सांगत ठाकरेंसोबत राहणार असल्याचे म्हटलंय. या तिघी नेत्यांच्या दाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय आम्ही कोणाला ऑफर देणार नाही, पण मोदींचं नेतृत्व मान्य असेल तर त्यांना रोखणारही नाही. बघा नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

Published on: Jan 19, 2024 12:45 PM
वादात सापडलेली तलाठी परीक्षा अन् नोकर भरती; राज्यात परीक्षार्थी आक्रमक, थेट उतरले रस्त्यावर
ठाकरे गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा; भाजपच्या जुन्या आरोपांवरून विरोधकांचा घेरा