धनंजय मुंडे-चंद्रशेखर बावनकुळेंची गळाभेट; व्हिडीओ चर्चेत

| Updated on: Jun 20, 2022 | 3:12 PM

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात विधान परिषदेच्या आज होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे.

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात विधान परिषदेच्या आज होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचं आव्हान असताना भाजपने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. यादरम्यान भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हालचाली विशेष चर्चेत आल्या आहेत. धनंजय मुंडे विधान भवनात येताच बावनकुळे यांनी आधी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि नंतर त्यांची गळाभेट घेतली. या भेटीला व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

Published on: Jun 20, 2022 03:12 PM
Video : आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच- गोपीचंद पडळकर
हिटलर की मौत मरेगा मोदी, काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांचं वादग्रस्त वक्तव्य