नागपूर महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची- चंद्रशेखर बावनकुळे
‘जिल्ह्यात ५० हजार तरुण मतदारांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार असून, एका बुथवर २५ रुण सज्ज असणार आहे. ५० हजार तरुण मतदारांची फळी असल्यावर भाजप विरोधात कुठला पक्ष टिकाव धरणार नाही’ असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नागपूर महानगरपालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळेच निवडणूकीच्या सहा महिने आधीपासून भाजपने मिशन महानगरपालिका निवडूण सुरु केलंय. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी युवा मतदारांवर डोळा ठेवत भाजपने निवडणूक तयारी सुरु केलीय. नागपूरात भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे घेतले, ‘जिल्ह्यात ५० हजार तरुण मतदारांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार असून, एका बुथवर २५ रुण सज्ज असणार आहे. ५० हजार तरुण मतदारांची फळी असल्यावर भाजप विरोधात कुठला पक्ष टिकाव धरणार नाही’ असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नागपुरात भाजप गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूकीत भाजपला ॲंटीइक्मबंसीचा फटका बसण्याचीही भिती आहे. त्यामुळेच भाजपने 18 ते 25 वयोगटातील युवा मतदारांवर डोळा ठेवत, सहा महिन्याआधीपासूनंच तयारी सुरु केलीय.