सोन्याच्या चमच्याने बदामाचे ज्यूस घेत उद्धव मोठे झाले…बावनकुळे असे का म्हणाले?

| Updated on: Jan 12, 2023 | 3:06 PM

उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यांशी जी युती करताय, ती फक्त निवडणुकीपुरती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वेळच राहणार नाही. सोन्याच्या चमच्याने बदामाचे ज्युस घेऊन उद्धव ठाकरे मोठे झाले आहे

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यांवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीकास्त्र केले. ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही युती अनैसर्गिक आहे. उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यांशी जी युती करताय, ती फक्त निवडणुकीपुरती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वेळच राहणार नाही. सोन्याच्या चमच्याने बदामाचे ज्युस घेऊन उद्धव ठाकरे मोठे झाले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या यात्रे दरम्यान अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे नाना पटोले यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Published on: Jan 12, 2023 03:06 PM
बच्चू कडू यांचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? अमोल मिटकरी यांचा मोठा दावा
महाविकास आघाडीत असूनही नाना पटोले यांना का वाटतेय धोक्याची घंटा? स्पष्टच सांगितले…