VIDEO : Chandrashekhar Bawankule | 4 मार्च 2021ला निकाल आला तेव्हा पासून झोेपले होते का ? – बावनकुळे
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील. त्या ओबीसी विरुद्ध ओपन अशा होणार नाहीत. ओबीसी समाज आपल्या हक्कांबाबत प्रचंड जागृत झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना याच मार्गाने जावं लागेल.
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील. त्या ओबीसी विरुद्ध ओपन अशा होणार नाहीत. ओबीसी समाज आपल्या हक्कांबाबत प्रचंड जागृत झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना याच मार्गाने जावं लागेल. नाही तर त्यांना महागात पडेल, असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण वगळून कुणालाही पुढे जायचं नाही. राज्यातील ओबीसी जागृत आहे. त्यावर आता बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, 4 मार्च 2021 ला निकाल आला तेव्हा पासून झोेपले होते का ?. यावरून आता राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून चांगला गदारोळ होण्याची शक्यता आहे.