VIDEO : Chandrashekhar Bawankule | लवकर डाटा गोळा करा, पण ओबीसी समाजाचा फुटबॉल करु नका : चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Aug 03, 2021 | 1:21 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच तसा आरोप केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असं वंजारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस जर ओबीसींच्या बाजूने आहे तर ओबीसी विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे?, असा सवाल करतानाच ओबीसींचा एवढाच कळवळा असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, असं आव्हानच बावनकुळे यांनी दिलं आहे.

Rajesh Tope on Zika | राज्यात झिका विषाणूचा सध्या एकच रुग्ण : राजेश टोपे
Vijay Wadettiwar on OBC | केंद्र सरकार ओबीसींच्या हक्काचा डेटा देत नाही : विजय वडेट्टीवार