ISRO च्या कामगिरीला ‘चंद्र आहे साक्षीला’, प्रक्षेपण ते लँडिंग जाणून घ्या…सोप्या भाषेत

| Updated on: Aug 06, 2023 | 3:13 PM

VIDEO | चंद्रयान ३ चं प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या सोप्या सरळ भाषेत

मुंबई, ६ ऑगस्ट, २०२३ | ISRO च्या चांद्रयान ३ नं महत्त्वाची कामगिरी नुकतीच यशस्वीरित्या पार पाडत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. यानंतरचा पुढचा प्रवास कसा असणार? त्याचे पुढचे टप्पे नेमके कसे असणार? जाणून घ्या… अनेक वर्षापासूनचं स्वप्न असेलल्या चांद्रयान-3 ने मोठी कामगिरी केली आहे. भारताचं हे तिसरं मानवरहित चांद्रयान आहे. या चांद्रयानाने शनिवारी संध्याकाळी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्रावर उतरण्याआधी चंद्रयान ३ मिशनचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा टप्पा पार झालाय. तो म्हणजे पृथ्वीच्या कक्षेतून या याननं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. या प्रक्रियेदरम्यान चांद्रयान ३ नं अनेक टप्पे पार केलेत. १४ जूलैला चंद्रयान ३ लाँच करण्यात आलं. १५ जुलैला पृथ्वीभोवतीची पहिली फेरी पूर्ण केली. नंतर इस्त्रोनं चंद्रयानाचं अंतर पृथ्वीपासून वाढवलं. यानंतर लंबगोलाकार ५ फेऱ्या पूर्ण केल्यात. नंतर हे यानं पृथ्वीपासून लांब गेलं.

Published on: Aug 06, 2023 03:13 PM
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी धोक्यात; सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाचे संकट; उत्पादनही घटणार
नाशिकच्या धरण क्षेत्रात वरूण राजाची कृपा; केळझर धरण ‘ओव्हर फ्लो’ अन् बळीराजा सुखावला