इस्त्रोची कामगिरी अन् चंद्रावर भारत, भारतीय चांद्रयान ३ मोहिमेवरून भाजप विरूद्ध काँग्रेस

| Updated on: Aug 24, 2023 | 10:42 PM

VIDEO | भारतीय चांद्रयान ३ चंद्रावर पण भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयावरुन वाद! काँग्रेस आणि शरद पवार यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीचं फळ असल्याचे म्हटलंय. तर भाजपनं काय म्हटलंय?

Follow us on

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी झाली. भारतानं आपली छाप जगात उमटवली. इस्त्रोच्या शानदार कामगिरीमुळे चंद्रावर पाऊल ठेवलं आहे आणि दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. फक्त भारतच नाही तर अमेरिकेच्या नासासह जगभरातील देशाच्या नजरा ज्या क्षणाकडे होत्या तोच हा क्षण…चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झालं आणि भारतानं इतिहास रचला. पण आता मोहीमेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयावरुन वादाची लढाई सुरू झाली आहे. तर काँग्रेस आणि शरद पवार यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीचं फळ असल्याचे म्हटलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात इस्त्रोच्या जास्तीत जास्त मोहीमा झाल्याचं भाजपनं म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट