भारताचं चांद्रयान-३ चंद्रावर कसं उतरलं तुम्ही पाहिलं का? इस्त्रोनं केला व्हिडीओ शेअर

| Updated on: Aug 24, 2023 | 8:59 PM

VIDEO | चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब... भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडीओ इस्त्रोकडून टि्वट, तुम्ही पाहिलं का चंद्रावर चांद्रयान-३ कसं उतरलं?

Follow us on

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी झाली. भारतानं आपली छाप जगात उमटवली. इस्त्रोच्या शानदार कामगिरीमुळे चंद्रावर पाऊल ठेवलं आहे आणि दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. फक्त भारतच नाही तर अमेरिकेच्या नासासह जगभरातील देशाच्या नजरा ज्या क्षणाकडे होत्या तोच हा क्षण…चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झालं आणि भारतानं इतिहास रचला आणि संपूर्ण भारतात एकच जल्लोष झाला. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक केले जात आहे. अशातच चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरने चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाचे चार फोटो पाठवले आहेत. इस्त्रोने हे फोटो त्यांच्या ट्वीटवरून शेअर केल्यानंतर आता चांद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडीओ इस्त्रोकडून टि्वट करण्यात आला आहे.