इतिहास घडला, भारत चंद्रावर! चांद्रयान 3 यशस्वी करणारे 7 शिलेदार कोण आहेत माहितीये का?
VIDEO | चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगनं रचला इतिहास... अमेरिका, रशिया आणि चीन नंतर अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश, चांद्रयान 3 यशस्वी करणारे 7 शिलेदार कोण ?
मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | भारताचे चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आले. गेल्या ७३ दिवसांपासून या मोहिमेसाठी इस्त्रोचे शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करत होते. चांद्रयान ३ च्या या यशात इस्त्रोच्या ७ शिलेदारांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिले आहेत. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशात आनंद बघायला मिळत आहे. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक केले जात आहे. या कामगिरीनं अंतराळ इतिहासात इस्त्रोनं नवा अध्याय लिहीला आहे. दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश आहे. या चांद्रयान ३ मोहिमेमध्ये चंद्रावर यशस्वी चांद्रयान ३ लँडिंग करण्याच्या भूमिकेत ७ शिलेदारांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. कोण आहेत ते शिलेदार बघा स्पेशल रिपोर्ट…