पुण्यातील PMPML चे ‘हे’ ८ मार्ग उद्या राहणार बंद, प्रशासनानं का घेतला निर्णय?
VIDEO | येत्या ७ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील पीएमपीएमएल मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे, दहीहंडी या सणामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे
पुणे, ६ सप्टेंबर २०२३ | येत्या 7 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव असल्याने पुणे शहरातील पीएमपीएमएच्या काही मार्गात बदल करण्यात आला आहे तर काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बसमार्ग क्र. 50 शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून सुरू राहणार आहे. बस मार्ग क्र. 113 अ.ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन स्थानकावरून सुरू राहणार आहे. स्वारगेट आगाराकडून बस मार्ग क्र. 3 आणि 6 हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बस मार्ग क्र. 7, 197, 202 या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने राहणार आहे. बस मार्ग क्र. 68 या मार्गाचे बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने सुरू राहणार आहे. मार्ग क्र. 174 हा 6 आणि 7 सप्टेंबर रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कन मार्गे सुरू राहणार आहे.