ठाणेकरांनो… उद्या घराबाहेर पडताय? दहिहंडी उत्सवानिमित्त कसे असणार वाहतुकीचे मार्ग?
VIDEO | ठाणे शहरात उद्या दहीहंडी सणानिमित्त लोकांची वर्दळ असल्याने ठाण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ठाणे शहरात जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. उद्या 750 ट्रॅफिक आणि लोकल पोलीस यांच्या माध्यमातून बंदोबस्त
ठाणे, ६ सप्टेंबर २०२३ | ठाणे शहरात उद्या दहीहंडी सणानिमित्त लोकांची गर्दी होणार आहे. त्यानुसार ठाण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जड अवजड वाहने यांना ठाणे शहरात प्रवेश बंदी असणार आहे. तर 750 ट्रॅफिक पोलीस आणि लोकल पोलीस यांच्या माध्यमातून बंदोबस्त करण्यात येणार आहे. उपवन ते काशिनाथ घाणेकर मार्ग बंद असणार आहे तर ही वाहतूक त्याग्रज बिल्डिंग कडून वळवण्यात येणार आहे. वसंत विहार कडून घाणेकर रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तर केव्हारा सर्कल ते घाणेकर मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तर ही वाहतूक केव्हारा सर्कल वरून वळवण्यात आली आहे. ठाण्यातील वाहतूक अजून कोणत्या मार्गाने राहणार सुरू आणि कोणत्या मार्गाने वाहतुक वळवण्यात आली आहे. बघा व्हिडीओ
Published on: Sep 06, 2023 04:42 PM