बांगलादेश पेटला की पेटवला? 20 वर्षांच्या सत्तेचा 45 मिनिटांत चक्काचूर.., भविष्यात नवा पाकिस्तान बनणार?

| Updated on: Aug 07, 2024 | 12:09 PM

संपूर्ण बांगलादेशात अराजकता माजली असल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणावरुन वादाची ठिणगी पडली असून बांगलादेश पेटला आहे. दंगलखोरांकडून बांगलादेशातील सार्वजनिक मालमत्तेची नासधूस सुरु आहे. तसंच हिंदूवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.

पूर्ण बांगलादेशी सैन्य ज्या शेख हसीना सलामी देत होतं त्याच हसीना यांना अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला. जमावाने पंतप्रधान निवासातील कपड्यांपासून सर्व काही लुटलं. हसीनांच्या घरात होणाऱ्या लुटमारीची व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आंदोलकांनी ताबा मिळवल्यानंतर बांगलादेशातील संसदेतील परिस्थितीही काहिशी भयावह होती. हसीना यांचं पद गेलं. घर लुटलं गेलं आणि राष्ट्रपित्याचा दर्जा असणाऱ्या वडिलांचा पुतळा जमीनदोस्त करण्यात आला. वडिलांच्या घराची नासधुस झाली. प्रमुख रस्ते घोषणांनी रंगवले गेल्याचे पाहायला मिळाले. शेख हसीना यांच्या मुलाने बांगलादेशात कधीही पाय न ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शेख हसीना यांना बांगलादेशात दार बंद आहे. तर भारतात तात्पुरता आश्रय देण्यात आला मात्र ब्रिटनमध्ये जाण्याचा विचार असला तरी त्यांच्याकडून हसीना यांना कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 07, 2024 12:09 PM