VIDEO : CM Sangli Visit LIVE | मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले

| Updated on: Aug 02, 2021 | 1:47 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीत आहेत. सांगलीच्या गावागावात जाऊन ते पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं.

VIDEO : CM Uddhav Thackeray Sangli Visit | सांगलीतील आर्विन पुलावर मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
Uddhav Thackeray | दरवर्षी मदत करणार, मात्र पुन्हा तेच होणार असं आयुष्य मला तरी मान्य नाही