Mumbai Air Pollution : मुंबईतील ‘हे’ शहर सर्वाधिक प्रदूषित, काय आहे हवेची गुणवत्ता ढासळण्याचं कारण?

| Updated on: Nov 07, 2023 | 12:58 PM

महाराष्ट्रातील चेंबूर हे ठिकाण सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळपासून या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहनं बऱ्याच वेळ एकाच जागी थांबून असल्याने वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूरानं प्रदूषण

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | महाराष्ट्रातील चेंबूर हे ठिकाण सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या चेंबूर शहरातील हवेची गुणवत्ता चांगलीच खालावत जात आहे. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होणाऱ्या वाहतूक कोडींमुळे चेंबूर येथील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील चेंबूर हे शहर सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जात आहे. रोज सकाळपासून या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहनं बऱ्याच वेळ एकाच जागी थांबून असल्याने वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूरानं प्रदूषण होत असल्याचे सांगितले जात आहे. यासह वाहनं किंवा औद्योगिक अस्थापनांमधून होणारे प्रदूषण, जाळण्यात आलेला कचरा आणि बांधकाम सुरू असताना उडणारी धूळ असेल त्यामुळे चेंबूर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.

Published on: Nov 07, 2023 12:58 PM