जरा कळ सोसा…अजितदादांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले; छगन भुजबळ अन् मुंडेंचा निर्धार काय?
अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. यानंतर अजित पवार यांनी जरा कळ सोसा... म्हणत आपल्याच नेत्यांचे कान टोचलेत. नेमकं कोणी काय केलं आवाहन, बघा स्पेशल रिपोर्ट?
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : अजित पवार यांना २०२४ मध्ये मुख्यमंत्री करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. यानंतर अजित पवार यांनी जरा कळ सोसा… म्हणत आपल्याच नेत्यांचे कान टोचलेत. मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या निर्धारानंतर पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्यात. पुण्यातील अजित पवार गटाच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्धार या प्रमुख नेत्यांनी केला. २०२४ मध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी जबाबदारी पार पाडा, असं आवाहन मुंडे आणि भुजबळ यांनी केलंय. अजितदादांना सीएम केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, तर अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचं आपलं स्वप्न, नेमकं कोणी काय केलं आवाहन, बघा स्पेशल रिपोर्ट?