VIDEO : Breaking | शाब्दिक वादानंतर छगन भुजबळ आणि सुहास कांदे एकाच बैठकीत

| Updated on: Sep 12, 2021 | 2:32 PM

तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आणि त्यानंतर आता शाब्दिक वादानंतर छगन भुजबळ आणि सुहास कांदे एकाच बैठकीत भेटले.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा वादळी ठरला होता. कारण छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार खडाजंगी झाली होती. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आणि त्यानंतर आता शाब्दिक वादानंतर छगन भुजबळ आणि सुहास कांदे एकाच बैठकीत भेटले. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाल. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली होती.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 12 September 2021
VIDEO : superfast 5050 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 September 2021