राष्ट्रवादीला मोठा धक्का, छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करणार

| Updated on: Apr 17, 2023 | 9:15 AM

VIDEO | राष्ट्रवादीसह शहर विकास आघाडीचे माजी 11 नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्ते भाजपमध्ये दणक्यात प्रवेश करणार, कुठं राष्ट्रवादीला मोठा धक्का?

नाशिक : सटाणाचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनील मोरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. तर आता छगन भुजबळ यांचे निकवर्तीय सुनील मोरे हे शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सर्व जण लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. सुनील मोरे यांच्या प्रवेशाने भाजपला नाशिक ग्रामीणमध्ये मोठी ताकद मिळणार आहे. सुनील मोरे हे राष्ट्रवादीसह शहर विकास आघाडीच्या माजी ११ नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश करणार आहेत. दरम्यान, सुनील मोरे यांनी पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वच मातब्बरांना धोबीपछाड देत निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती. त्यामुळे भाजपमधील त्यांचा प्रवेश मोठा आणि महत्त्वाचा मानला जात आहे.

Published on: Apr 17, 2023 09:07 AM
अमोल मिटकरी सरकार विरोधात राज्यपालांकडे काय करणार मागणी?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ‘या’ संघटनेची मागणी