एक-दोन नव्हे तर चार वेळा छगन भुजबळ यांचा ताफा रोखला, मराठा समाज आक्रमक
हिंगोलीतील ओबीसी महामेळाव्यासाठी जात असताना छगन भुजबळ यांचा ताफा आडवण्याचा आणि काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. यानंतर ओबीसी समाजातील नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. जरांगे पाटील भुजबळांवर टीका करत असल्याने भुजबळांकडून देखील पलटवार होतोय मात्र यामुळे त्यांना मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय
मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३ : हिंगोलीतील ओबीसी महामेळाव्यासाठी जात असताना छगन भुजबळ यांचा ताफा आडवण्याचा आणि काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. यानंतर ओबीसी समाजातील नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार पलटवार सुरू आहे. जरांगे पाटील भुजबळांवर टीका करत असल्याने भुजबळांकडून देखील पलटवार होतोय मात्र यामुळे त्यांना मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील सभेला जाताना छगन भुजबळ यांच्या ताफ्याला तीनदा रोखण्याचा प्रयत्न झाला तर यावेळी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. हिंगोलीतील सभेला जात असताना नांदेड येथे तीन तरूणांनी त्यांचा ताफा रोखला या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अर्धापूर येथील पिंपळगाव पाटी येथेही तसाच प्रकार घडला तर कळमनुरी येथील काडली परिसरात ताफा अडवत काळे झेंडे दाखवले गेले. यानंतर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार टीका केली.