Chhagan Bhujbal : होय… त्यादिवशी मी खोटं बोललो, छगन भुजबळ यांनी का अन् कशाबद्दल दिली कबुली?
tv9 Special Report | राज्यात दीड महिने काय शिजत होतं? 3 जुलैला आपण खोटं बोललो अशी कबुली देत मंत्री छगन भुजबळ यांनी सत्तानाट्याची बरीचशी स्क्रिप्ट टीव्ही 9 च्या मुलाखतीत उलगडली आहे. भुजबळांच्या या कबुलीला प्रामाणिकपणाही म्हणता येईल, पण काय केलं भुजबळांनी भाष्य?
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | 3 जुलैला आपण खोटं बोललो अशी कबुली देत छगन भुजबळांनी सत्तानाट्याची बरीचशी स्क्रिप्ट टीव्ही 9 च्या मुलाखतीत उलगडली आहे. मात्र भुजबळांच्या या कबुलीनं शरद पवार गटाच्या दाव्यांना बळ आलंय. भुजबळांच्या या कबुलीला प्रामाणिकपणाही म्हणता येईल आणि दुसऱ्या बाजूला भुजबळांनी केलेला सेल्फ गोल सुद्धा… याचं कारण अजित पवारांनी फडणवीसांसोबत घेतलेला पहाटेच्या शपथविधी असो वा मग आता सत्तेत गेलेला अजित पवारांचा गट असो. भुजबळांच्या दाव्यानुसार याबाबत सत्ता समीकरणांच्या चर्चा शरद पवारांसोबत झाल्या होत्या, मात्र पहाटेचा शपथविधी घेणं आणि आत्ता सत्तेत सामील होणं. या दोन्ही गोष्टी शरद पवारांना न कळवता झाल्या. 3 जुलैला जेव्हा अजित पवार गट सत्तेत गेला. त्यावेळी आपण शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी खोटं बोललो. कारण शपथविधी सुरळीत व्हावा, हा त्यामागचा हेतू असल्याची कबुलीही भुजबळांनी दिलीय. आता पडद्यामागे नेमकं काय घडत होतं. बघा स्पेशल रिपोर्ट